महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात 1 हजार 434 नवे कोरोनाबाधित; 26 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सोमवारी 1 हजार 434 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.

Satara civil hospital
सातारा जिल्हा सामान्य रुग्णालय

By

Published : Apr 27, 2021, 11:10 AM IST

सातारा -जिल्ह्यात सोमवारी 1 हजार 434 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

खटावमध्येही रुग्ण वाढ -

तालुकानिहाय कोरोना बाधितांची सध्याची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे दिली आहे. - जावली 77 (4401), कराड 76 (14762), खंडाळा 87 (5861), खटाव 270 (8108), कोरेगांव 118 (8007), माण 145 (5468), महाबळेश्वर 38 (3158), पाटण 32 (3802), फलटण 204 (11983), सातारा 295 (21800), वाई 84 (7238 ) व इतर 11 (468) असे आजअखेर एकूण 95,056 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

क‍ालच्या मृतांमध्ये फलटणचे सात -

सध्या मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे - जावली 0 (95), कराड 5 (413), खंडाळा 0 (78),खटाव 3 (232), कोरेगांव 2 (224), माण 2 (128), महाबळेश्वर 0 (28), पाटण 1 (113), फलटण 7 (175), सातारा 5 (697), वाई 1 (172), असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 355 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details