महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Corona Update : सातारा जिल्ह्यात 340 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, एकाचा मृत्यू - नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ

सातारा जिल्ह्यात रविवारी (दि. 9 जानेवारी) 340 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली ( Satara Corona Update ) आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 6 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती सातारा जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

satara corona update
satara corona update

By

Published : Jan 9, 2022, 10:12 PM IST

सातारा - जिल्ह्यात रविवारी (दि. 9 जानेवारी) 340 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली ( Satara Corona Update ) आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 6 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती सातारा जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

1 हजार 56 सक्रिय रुग्ण

मागील 24 तासांत 3 हजार 567 नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 340 जणांना काेविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यावरुन रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर वाढून 9.53 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 56 सक्रिय रुग्ण असून ( Active Corona Cases in Satara ) त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आजअखेर

नमुने -24 लाख 2 हजार 906

बाधित - 2 लाख 53 हजार 987

मृत्यू - 6 हजार 501

कोरोनामुक्त - 2 लाख 45 हजार 311

हेही वाचा -Earthquake at Koyna Dam : कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

ABOUT THE AUTHOR

...view details