महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना धरणातून पाणी सोडताना योग्य निर्णय घेतले जातील : शेखर सिंह

गतवर्षी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा विचार करता यावर्षीचे आपात्कालीन नियोजन काय असेल, अशी विचारणा केली असता सिंह म्हणाले, 'गतवर्षीच्या पूरपरिस्थितीचा मी तीन वेळा आढावा घेतला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली तर पूररेषेतील प्रत्येक कुटुंबाचे स्थलांतर करण्याबाबतचे नियोजन केले असून त्यावेळी अचानक अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठी प्रशासन दक्ष आहे.' 

सातारा लेटेस्ट न्यूज
सातारा लेटेस्ट न्यूज

By

Published : Jun 5, 2020, 7:44 AM IST

सातारा - ‘कोरोना महामारी संकटाच्या कालावधीत पाटण तालुक्यातील जनता, मीडिया व प्रशासकीय यंत्रणेने जबाबदारीने काम केल्यामुळेच मुंबई-पुण्यासारख्या शहरातून मोठ्या प्रमाणावर लोक येऊनही पाटण तालुक्यात कोरोना नियंत्रणात राहिला. त्याचबरोबर गतवर्षीची पूरपरिस्थिती लक्षात घेता यावर्षी कोयना धरणातून पाणी सोडताना योग्य निर्णय घेतले जातील,’ असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोरोना व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी पाटण तालुक्यात पाहणी दौरा केला. त्यानंतर तहसील कार्यालयात तालुक्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सर्व अधिकारी उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या कालावधीत तालुक्यातील जनता, मीडिया व प्रशासकीय यंत्रणेने जबाबदारीने काम केले आहे. मुंबई, पुणेसह इतर परजिल्ह्यातून शहरात मोठ्या प्रमाणावर लोक दाखल झाले असतानाही पाटण तालुक्यात कोरोनाचे संकट नियंत्रणात राहिले आहे. कोयना धरणात 30 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा असून यावर्षी हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे,’ असे तहसील कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले.

गतवर्षी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा विचार करता यावर्षीचे आपात्कालीन नियोजन काय असेल, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, 'गतवर्षीच्या पूरपरिस्थितीचा मी तीन वेळा आढावा घेतला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली तर पूररेषेतील प्रत्येक कुटुंबाचे स्थलांतर करण्याबाबतचे नियोजन केले असून त्यावेळी अचानक अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठी प्रशासन दक्ष आहे.'

ABOUT THE AUTHOR

...view details