कराड(सातारा) - सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांनीच उपस्थित राहण्याच्या अटी-शर्तींवर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना मासिक सभा घेण्यास परवानगी दिली आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीस सभेला उपस्थित राहण्यास मनाई आहे.
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांची अटी-शर्तींसह परवानगी - satara corona news
सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे, अशी खबरदारी घ्यावी. तसेच मासिक सभा शक्यतो मोकळ्या जागेत घेण्यात यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात केली आहे.
प्रत्येक महिन्यात पंचायतीची सभा घेतली नाही, तर निरर्हतेसारखी कारवाई होण्याची शक्यता ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व्यक्त करत होते. तसेच प्रत्येक महिन्यात मासिक सभा घेणे ग्रामपंचायतींना कायद्याने बंधनकारक आहे. शिवाय कोरोनाबाबत ग्रामपंचायत स्तरावरील उपाययोजनांसाठी मासिक सभेमध्ये निर्णय घेणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मासिक सभा घेण्यास परवानगी दिली आहे.
सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे, अशी खबरदारी घ्यावी. तसेच मासिक सभा शक्यतो मोकळ्या जागेत घेण्यात यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात केली आहे. अटी-शर्तींचा भंग झाल्यास पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असेही आदेशात म्हटले आहे.