महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा : नव्या आदेशानुसार किराणा, खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच राहाणार सुरू - साताार जिल्हा न्यूज अपडेट

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून नवे आदेश काढण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार आता किराणा दुकाने, भाजीपाला मार्केट, डेअरी, बेकरी, यांच्यासह सर्व खाद्य पदार्थांची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

साताऱ्यात कोरोना निर्बंधांची कडक अंमलबाजावणी
साताऱ्यात कोरोना निर्बंधांची कडक अंमलबाजावणी

By

Published : Apr 20, 2021, 10:46 PM IST

सातारा -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून नवे आदेश काढण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार आता किराणा दुकाने, भाजीपाला मार्केट, डेअरी, बेकरी, यांच्यासह सर्व खाद्य पदार्थांची दुकाने, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने स्टॉल, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खादयपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणा-या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने, सकाळी 7 ते 11 या कालावधीतच चालू ठेवण्यास मूभा देण्यात आली आहे. मात्र दुकानदारांना सायंकाळी 5 पर्यंत घरपोच सेवा देण्याची परवानगी असणार आहे.

मेडिकल दुकाने रात्री 8 पर्यंत राहणार सुरू

नव्या आदेशानुसार मेडिकल दुकाने ही सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहेत. हॉस्पीटलमधील मेडिकल दुकाने मात्र पुर्णवेळ चालू राहतील. याचबरोबर वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके यांच्या वितरणाला देखील सकाळी 7 ते 11 याचवेळेत परवानगी देण्यात आली आहे.या आदेशांची अंमलबजावणी आज रात्रीपासून ते 1 मे पर्यंत असणार आहे.

किराणा, खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच राहाणार सुरू

घरपोच मद्यविक्री

सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दारू दुकानातून घरपोच मद्य विक्री करण्यास परवानी देण्यात आली आहे. मात्र ग्राहकाला दारूच्या दुकानात येऊन दारू खरेदी करण्यास नव्या आदेशानुसार मनाई असणार आहे. दरम्यान कोणी निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा -खोपोलीत तीन दिवसांच्या जनता कर्फ्यू नंतर बाजारात प्रचंड गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details