सातारा -जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे करणाऱ्या चार टोळ्यांमधील 18 जणांना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
सातारा-कराड-वाईतील टोळ्या
सातारा -जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे करणाऱ्या चार टोळ्यांमधील 18 जणांना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
सातारा-कराड-वाईतील टोळ्या
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारामारी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे आमिर मुजावर (रा. पिरवाडी), अमिर सलीम शेख (रा.वनवासवाडी), अभिजीत राजू भिसे (रा.आदर्श नगरी सैदापूर), जगदीश रामेश्वर मते (रा.शाहूपुरी), आकाश हनुमंत पवार, सौरभ उर्फ गोट्या संजय जाधव (दोघेही रा. सैदापूर सातारा) यांच्यावर दाखल आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या, चोरी, मारामारी करणाऱ्या टोळीतील सागर नागराज गोसावी, अर्जुन नागराज गोसावी, रवी निलकंठ घाडगे ( सर्व रा.यशवंतनगर सैदापूर), विपुल तानाजी नलावडे (रा.वायदंडे कॉलनी सैदापूर), अक्षय रंगनाथ लोखंडे (रा. सैदापूर सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मारामारी, सरकारी कामात अडथळा आणणे, ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे रॉकी निवास घाडगे, कृष्णा निवास घाडगे, सनी निवास घाडगे (सर्व रा.लाखानगर सोनगिरवाडी वाई) यांच्यावर दाखल आहेत. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गुन्हे दाखल असलेल्या आशिष अशोक पाडळकर, इंद्रजीत हनुमंत पवार, अनिकेत रमेश शेलार (सर्व रा. मलकापूर कराड), सुदर्शन हनुमंत चोरगे (रा. कोयना वसाहत कराड) यांना दोन वर्षांसाठी तडीपार केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
दोन वर्षांसाठी तडीपारीचे आदेश
जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या घरफोड्या करणाऱ्या टोळीतील गुंडांकडून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे होत्या. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांनी संबंधितांवर वेळोवेळी कारवाया केल्या. तरी त्यांच्या वागण्यात सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील ते वारंवार गुन्हा करत असल्याने स्थानिक पोलिस ठाण्यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे या सर्व जणाच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर बंसल यांनी चार टोळ्यातील 18 जणांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. ते जर पुन्हा जिल्ह्यात आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.