सातारा - टाळ मृदुंगाच्या गजरात आणि मोठ्या आनंदाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पाडेगाव येथे आगमन झाले. आज दुपारी 2 च्या सुमारास हरिनामाच्या जयघोषात व भक्तीमय वातावरणात ही पालखी येथे पोहोचली. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी व स्थानिक मंडळी माऊलींचा पालखी सोहळ्यातील भक्तीरसात चिंब होऊन गेले.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुष्प अर्पण करून स्वागत केले. यावेळी आण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्रांताधिकारी संगीता चौगुले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आदींसह विविध पदाधिकारी, मान्यवर पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित होते.