महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 3, 2020, 1:04 AM IST

ETV Bharat / state

संदीप सावंतांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, विजापूर-चिपळूण महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने

सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांच्या पार्थिवाची कराड ते मुंढेपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून यासाठीची तयारी गुरूवारी पूर्ण झाली.

संदीप सावंतांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
संदीप सावंतांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

सातारा- नववर्षाच्या पूर्वसंध्येला जम्मू-काश्मिरच्या नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना धारातिर्थी पडलेल्या मुंढे येथील जवान संदीप सावंत यांचे पार्थिव आज सकाळी कराडात दाखल होणार आहे. सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांच्या पार्थिवाची कराड ते मुंढेपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून यासाठीची तयारी गुरूवारी पूर्ण झाली.

संदीप सावंत हुतात्मा झाल्याचे वृत्त समजताच माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी दुपारी मुंढे येथे येऊन संदीपचे वडील रघुनाथ सावंत यांचे सांत्वन केले. तसेच संदीप यांच्या पार्थिवावर ज्याठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत, तेथील तयारीची पाहणी करून अधिकार्‍यांना सूचना केल्या. गुरूवारी दुपारी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, डीवायएसपी सूरज गुरव, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणच्या तयारीची पाहणी केली.

अंत्यसंस्कारावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांच्या बसण्याची सोय आणि वाहनांचे पार्किंग करण्यात येणार्‍या जागेची पाहणी केली गेली. विजापूर-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तात्पुरती अन्य मार्गाने वळविण्याबाबत एसटी महामंडळ आणि कराड वाहतूक शाखेला सूचित करण्यात आले आहे.

संदीप सावंतांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

हुतात्मा संदीप सावंत याचे पार्थिव शुक्रवारी सकाळी 8 वाजता कराडच्या विजय दिवस चौकात येईल. त्याठिकाणी माजी सैनिकांच्या त्रिशक्ती संघटनेसह कराडकरांकडून पार्थिवाला श्रध्दांजली वाहिली जाईल. तेथून अंत्ययात्रेला सुरूवात होईल. दत्त चौक, शाहू चौक, कोल्हापूर नाकामार्गे राष्ट्रीय महामार्गावरून अंत्ययात्रा गोटे गावात दाखल होणार आहे. तिथून मुंढे गावात पोहोचल्यानंतर शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतील. यानंतर पार्थिव संदीप यांच्या एमएसईबी येथील निवासस्थानी नेण्यात येईल. याठिकाणी कुटुंबीय पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतील. त्यानंतर घराच्या पाठीमागील जागेत तयार करण्यात आलेल्या चबुतर्‍यावर संदीप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details