महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुरामुळे झालेल्या नुकसानासाठी कराड पालिकेकडून 23.95 कोटी रुपयांची मागणी - प्रितीसंगम कराड

या पुरामुळे कराड शहरातील प्रीतीसंगम घाटासह पालिकेच्या पाईपलाईन, ड्रेनेज चेंबरचे तसेच वारूंजी येथील जॅकवेल व रस्त्याचे नुकसान झाले आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे 23.95 कोटी रुपये इतका अंदाजे खर्च येणार आहे.

प्रितीसंगम कराड

By

Published : Aug 18, 2019, 7:29 PM IST

सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना पूर आला होता. या पुरामुळे कराड शहरातील प्रीतीसंगम घाटासह पालिकेच्या पाईपलाईन, ड्रेनेज चेंबरचे तसेच वारूंजी येथील जॅकवेल व रस्त्याचे नुकसान झाले आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे 23.95 कोटी रुपये इतका अंदाजे खर्च येणार आहे. दुरुस्तीसाठी लागणारा निधी तत्काळ द्यावा, अशी मागणी कराड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नगरविकास विभाग प्रशासनाकडे पत्राद्वारे सोमवारी केली.

प्रीतीसंगम कराड

कोयनेसह धोम, कण्हेर धरणातून पाणी सोडल्यामुळे रविवारी 4 ऑगस्टपासून कृष्णा व कोयना नद्यांची पाणीपातळी प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे नद्यांना आलेल्या महापुराचे पाणी कराड शहरातील इमारतींमध्ये घुसले. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ परिसर व प्रीतीसंगम बागही पूर्णपणे पाण्यात गेली होती. तीन ते चार दिवस हा परिसर पाण्याखाली असल्यामुळे येथील खेळणी, पाईपलाईन, वीजेचे खांब, ड्रेनेज लाईन पाईप, सीसीटीव्ही कॅमेरे यांचे नुकसान झाले आहे. तसेच वारुंजी येथील जॅकवेलची भिंतही कोसळली आहे. या बरोबरच शाळांच्या इमारती, पिण्याच्या पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईन, अनेक रस्ते तसेच पुलाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीसाठी नगरविकास प्रशासनाकडून 23.95 कोटी रुपये देण्यात यावेत. संबंधित रक्कम तातडीने मंजूर करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details