सातारा- लोकशाहीमध्ये उदयनराजे भोसले यांना लोकांनी निवडून दिले होते. परंतु, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि सातारा लोकसभेची पोटनिवडणूक झाली. लोकांनी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने कौल दिला. लोकशाहीने आणि लोकांनी घेतलेल्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत करावे, असे मत कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
उदयनराजेंनी लोकनिर्णयाचा आदरा करावा - रोहित पवार - rohit pawar new mla
लोकांच्या आशिर्वादाने मी विधानसभेची निवडणूक जिंकली. आमचे शक्तीस्थळ आणि प्रेरणास्थळ असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मतदार संघाच्या विकासासाठी मी कटीबध्द राहणार आहे, असे रोहित पवार म्हणाले
काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांची काय अवस्था झाली? विश्वासघात केलेला लोकांना आवडत नाही, असा टोलाही त्यांनी शरद पवारांना सोडून गेलेल्या नेत्यांना लगावला. रोहित पवार यांनी शुक्रवारी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.
लोकांच्या आशिर्वादाने मी विधानसभेची निवडणूक जिंकली. आमचे शक्तीस्थळ आणि प्रेरणास्थळ असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मतदार संघाच्या विकासासाठी मी कटीबध्द राहणार आहे, असे रोहित पवार म्हणाले. गट-तट, जातीय समीकरणे आणि पैशाचा वापर, अशा गोष्टींचा अजिबात वापर करायचा नाही, असे मी ठरविले होते. त्यानुसारच निवडणुकीला सामोरा गेलो आणि निवडूनसुध्दा आलो. अशा गोष्टी न करताही निवडणूक जिंकता येते, हा संदेश त्यामुळे युवकांमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले.