सातारा - दहिवडीच्या नगरपंचायतीचे नगरसेवक सतीश जाधव यांच्या बंद बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत आठ तोळे सोने व सत्तर हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी, की सतीश जाधव हे दोन दिवसांपूर्वी मळ्यातील घरी कुटुंबातील इतर सदस्यांसह राहण्यात गेले होते. आज सकाळी दहिवडी शहरात असलेल्या बंगल्यात गेले असता त्यांच्या छोट्या भावाला बंगल्याचे कुलूप आणि दरवाजा तोडल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी दहिवडी पोलिसांना चोरी झाल्याची माहिती दिली.
दहिवडीत धाडसी दरोडा; आठ तोळे सोन्यासह रोख रक्कम लांबवली - stolen gold and cash satara
सतीश जाधव हे दोन दिवसांपूर्वी मळ्यातील घरी कुटुंबातील इतर सदस्यांसह राहण्यात गेले होते. आज सकाळी दहिवडी शहरात असलेल्या बंगल्यात गेले असता त्यांच्या छोट्या भावाला बंगल्याचे कुलूप आणि दरवाजा तोडल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी दहिवडी पोलिसांना चोरी झाल्याची माहिती दिली.
![दहिवडीत धाडसी दरोडा; आठ तोळे सोन्यासह रोख रक्कम लांबवली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5093192-thumbnail-3x2-hng.jpg)
हेही वाचा -मी शरद पवार यांना भेटलो नाही - आमदार गोरे
त्यानुसार दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानुसार बंगल्याचे दार तोडून आतील लोखंडी कपाट फोडून कपडे इतरत्र विस्कटून टाकलेली पाहायला मिळाली. त्यामुळे साताऱ्यातून ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. दुपारी श्वान पथक आल्यावर त्याला घटनास्थळी काही वस्तूंचा वास दिला. त्यानंतर श्वानाने घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर मार्ग काढत घरापासून पाठीमागे माग काढायला सुरुवात केली. मात्र, अद्यापही चोरट्यांचा तपास लागलेला नाही.