सातारा- रितेश देशमुख आणि जेनेलिया 20 मार्च रोजी चार दिवस हवापालट करण्यासाठी कराडमध्ये आले होते. मात्र, कोरोनामुळे अचानक लॉकडाऊन करण्यात आले यामुळे ते अतुल भोसले यांच्या उत्तरा भवन बंगल्यावर रितेश, पत्नी जेनेलिया आणि मुले राहिल रिहान सोबत अडकले आहेत. असे असले तरी रितेश आपल्या कुटुंबासह लॉकडाऊनचा आनंद घेताना दिसत आहे.
जेनेलिया अनं रितेश देशमुख कुटुंबासह एक महिन्यापासून कराडमध्ये लॉकडाऊन - satara
कराडमधील भा्जप नेते अतुल भोसले यांचे बंधू विनूबाबा यांच्यासोबत रितेश देशमुख यांनी बनवलेला टिकटाॅक वरचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे तो कराडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले.
रितेश देशमुख यांचा दररोज सकाळी उठल्यापासून दिनक्रम ठरला असून सकाळी व्यायाम, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्यवसायाचे कामकाज पाहणे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चक्क रितेश पत्नी जेनेलियाला घरकामात मदत करत आहे, असाच एक भांडी घासतानाचा व्हिडिओ टिक टॉकवर अपलोड केला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.
कराडमधील भा्जप नेते अतुल भोसले यांचे बंधू विनूबाबा यांच्यासोबत रितेश देशमुख यांनी बनवलेला टिकटाॅक वरचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे रितेश देशमुख त्यांच्या कुटुंबासोबत लॉकडाऊनमुळे कराडमध्ये अडकल्याचे समोर आले.