महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चावी न दिल्याचा राग मनात धरुन केला खून, संशयित तीन तासात अटक - Sahara Police News

जिल्ह्यातील माहुली येथे एका युवकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

rickshaw-driver-was-killed-in-satara
चावी न दिल्याचा राग मनात धरुन केला खून

By

Published : Jan 31, 2020, 8:37 PM IST

सातारा -जिल्ह्यातील माहुली येथे एका युवाकचा डोक्यात फरशी घालून खून झाल्याची खळबळजनक गुरुवारी 10च्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीना अटक केली आहे. अभिजीत अशोक मोहिरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

क्षेत्र माहुली येथील अभिजीत अशोक मोहिरे (वय.25) हा व्यवसायाने रिक्षा चालक होता. गुरूवारी 30 तारखेला रात्री नऊच्या दरम्यान अभिजीत रिक्षा घेऊन घरी गेला होता. त्यावेळी संशयित आरोपी अमोल चव्हाण याने त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर अमोल घटनास्थळावरुन तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन अभिजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

जुन्या भांडणाच्या कारणावरुन तसेच गाडीची चावी न दिल्याचा राग मनात धरुन संशयित आरोपी अमोल चव्हाण याने अभिजीतचा खून केला. खुनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासांत संशयित आरोपी अमोल चव्हाणच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मांजरे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details