सातारा - परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. साताऱ्याच्या दुष्काळी भागालाही पावसाचा मोठा तडाखा बसला असून शेतांमध्ये सर्वत्र पाणी साचले आहे.
शनिवारपासून या पावसाचे थैमान सुरू असून काढणीला आलेला खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या दुष्काळी भागालाही पावसाचा मोठा तडाखा बसला असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची कामं सध्या सुरू आहेत. सोयाबीन, घेवडा तसेच भुईमुगाच्या शेंगाना यामुळे फटका बसलाय. काही ठिकाणी या पिकांची काढणी सुरू असतानाच पाऊस बरसल्याने मळणीची कामंही खोळंबली आहेत.