महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेवानिवृत्त प्राचार्य बी. एन. कालेकर यांना कराड गौरव पुरस्कार जाहीर - awarded by karad gauraw

सेवानिवृत्त प्राचार्य बी. एन. कालेकर यांनी कराडच्या शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानने त्यांना यंदाचा पुरस्कार जाहीर केला आहे. 5 हजार रूपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

retired principle b n kalekar will be awarded by karad gauraw
सेवानिवृत्त प्राचार्य बी. एन. कालेकर यांना कराड गौरव पुरस्कार जाहीर

By

Published : Jan 26, 2020, 3:47 AM IST

सातारा - कराडमधील पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षी कराड गौरव पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार कराडच्या सौ. वेणूताई चव्हाण महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बी. एन. कालेकर यांना जाहीर झाला आहे. राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत फेब्रुवारी महिन्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

सेवानिवृत्त प्राचार्य बी. एन. कालेकर यांनी कराडच्या शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानने त्यांना यंदाचा पुरस्कार जाहीर केला आहे. 5 हजार रूपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कालेकर यांनी चांदोली धरणाच्या परिसरातील गावांचा सामाजिक तसेच अनुसुचित जातींचा सामाजिक सर्व्हे केला आहे. 1997 व 2010 मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे आयोजन त्यांनी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details