सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 588 नागरीकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तर 43 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.
साताऱ्यात शनिवारी 1 हजार 588 कोरोनाबाधित ; 43 बाधितांचा मृत्यू - सातारा 836 रुग्णांना डिस्चार्ज
बाधितांमधे सातारा तालुक्यात सर्वाधिक 294 रुग्ण आढळले. तर जावळीत 42, कराड 237, खंडाळा 102, खटाव 249, कोरेगाव 257, माण 129, महाबळेश्वर 22, पाटण 81, फलटण 108, वाई 58 व इतर 9 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले आहेत. आज अखेर एकूण 1 लाख 72 हजार 85 नागरीकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. 13 हजार 186 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 1 हजार 588 बाधित निघाले.
सातारा कोरोना अहवाल
सातारा-खटाव वाढ कायम
हेही वाचा- प्रत्येक गावाने स्वत:चे गाव कोरोनामुक्त करावे - बाळासाहेब पाटील