सातारातालीम संघाच्या मैदानावर झालेल्या उदयनराजे मित्र मंडळ समुहाच्या दहिहंडी Udayanraje Dahihandi कार्यक्रमातील डॉल्बीचे डेसिबल घेऊन सातारा शहर पोलिसांनी तयार केलेला अहवाल सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या कार्यालयाकडे पाठवला Dolby Decibel Report send to Assistant Superintendent of Police आहे. त्यामुळे संभाव्य कारवाईकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दहीहंडी कार्यक्रमात कोयते नाचवणार्यांची देखील पोलिसांनी धरपकड केली armed men arrested by police in satara आहे. त्यामध्ये काही जण अल्पवयीन आहेत.
डॉल्बीवरून लोकप्रतिनिधी-प्रशासनामध्ये सामना डॉल्बी परवानगीवरून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये काही दिवसांपासून सामना रंगला आहे. पोलीस डॉल्बीला परवानगीला देणार नसल्याचे सांगत आहेत, तर गणेशोत्सवात डॉल्बी वाजणारच, असे लोकप्रतिनिधी म्हणत आहेत. याच दरम्यान, रविवारी उदयनराजे मित्र समुहाने आयोजित केलेल्या दहिहंडी कार्यक्रमात डॉल्बी वाजल्यानंतर पोलिसांनी नियमांप्रमाणे डेसिबल तीव्रता मोजून घटनास्थळाचे दोन पंचनामे केले. सोमवारी डॉल्बी डेसिंबलचा अहवाल सातारा शहर पोलिसांनी तयार सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या कार्यालयाकडे पाठवला आहे. अहवालाचे अवलोकन करुन पुढील कारवाई त्या करणार आहेत. नेमका प्रस्ताव काय आहे? याची माहिती समोर आलेली Dolby Decibel Report coming soon नाही.