महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फलटणमध्ये 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, वॉर्डबॉयसह दाम्पत्यालाही अटक - फलटण रेमडेसिवीर काळाबाजार

साताऱ्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली. यात एका हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय, तर एका दाम्पत्याचाही समावेश आहे. ते कमी किंमतीत रेमडेसिवीर घेऊन चढ्या भावाने विकत होते.

faltan
फलटण

By

Published : May 12, 2021, 4:11 PM IST

सातारा - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या फलटणमधील टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तर साताऱ्यातही एका हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्याप्रकरणी पत्नीसह रंगेहात पकडण्यात आले.

फलटणमध्ये 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मेडिकलवाल्याचाही सहभाग

फलटण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भारत केंद्रे यांनी याबाबतची माहिती दिली. 'फलटण शहरातील सुविधा हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय सुनील विजय कचरे (वय 38) हा 35 हजार रुपये किंमतीने इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सुनील कचरे व त्याच्या बरोबर असणारा अजय सुरेश फडतरे (वय 34 रा. पिंपरद, ता.फलटण) या दोघांना पकडले. त्यांच्याकडील चौकशीतून प्रवीण मिस्त्री उर्फ प्रवीण दिलीप सापते (वय 36, रा. घाडगेवाडी, ता. फलटण) व निखील घाडगे (वय 31, अनपटवाडी ता. खटाव) यांना अटक करण्यात आली. या चौघांची कसून चौकशी केली. यानंतर साताऱ्यातील अमित विजय कुलकर्णी (वय 45, आदर्श कॉलनी, गोडोली) याने हे इंजेक्शन तारळे (ता. पाटण) येथील रवींद्र रामचंद्र लाहोटी (वय 32) याच्याकडून घेतल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी तारळे येथील मानसी मेडिकलचा मालक अरुण शामराव जाधव यालाही अटक करण्यात आली आहे', असे भारत केंद्रे यांनी सांगितले.

दीड हजाराचे इंजेक्शन 20 हजाराला विकण्याचा घाट

सर्व साधारण दीड हजार रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजाराने 35 हजार रुपयांना विकले जात होते. फलटण पोलिसांनी हे रॅकेट चालवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, साताऱ्यातील समर्थ हॉस्पिटलमध्ये असिस्टंट म्हणून नोकरी करणारा एकजण त्याच्या पत्नीसह 20 हजार रुपयांला 1 अशी 2 इंजेक्शने विकण्यासाठी आला होता. याबाबत शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी सांगितले, की 'प्रशांत दिनकर सावंत (वय 29) व सपना प्रशांत सावंत (वय 25 पिंपळेश्वर-वाकडेश्वर मंदिर, पन्हाळे निवास, मंगळवार पेठ) असे या दाम्पत्याचं नाव आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना समर्थ मंदिर परिसरातील घाणेकर चौकात सावंत दांपत्य रेमडेसिवीरचे 2 इंजेक्शन घेऊन जाताना आढळले. अन्न व औषध प्रशासनाच्या फिर्यादीवरून या दाम्पत्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत मूळचे 3 हजार रुपये किमतीचे इंजेक्शन या दाम्पत्याने 12 हजार रुपयांना विकत घेतले होते. ते इंजेक्शन 20 हजार रुपयांना विकण्याचा घाट त्यांनी घातला होता. या कारवाईत पोलिसांनी 2 इंजेक्शन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रशांत सावंत याने इंजेक्शन पुण्यातून त्याच्या एका ओळखीच्या माणसाकडून मिळवले होते. शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -'पंतप्रधानांनी देशाला फक्त चीनी कचरा, चिंता आणि चिता दिल्या'

हेही वाचा -'कोरोना संकटात केंद्र व राज्यांनी काहीही लपवू नये'

ABOUT THE AUTHOR

...view details