सातारा - आज जिल्ह्यातील 19 नागरिक कोरोनामुक्त असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 5, पार्ले ता. कराड येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे 3, खावली ता. सातारा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे 5 आणि रायगाव ता. जावली येथील कोरोना केअर सेंटरमधील 6 अशा 19 जणांचा समावेश आहे.
सातार्यात १९ जण कोरोनाबाधितांना उपचारानंतर सोडले घरी
सातार्यात आज १९ कोरोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे वानरवाडी येथील 1 पुरुष व 1 महिला, उंब्रज येथील 1 महिला, पाटण तालुक्यातील सदुवरपेवाडी येथील 1 महिला, नवारस्ता येथील 1 मुलगी, पार्ले कोरोना केअर सेंटर, कराड येथे दाखल असणारे जावली तालुक्यातील सावरी येथील 2 महिला व 1 पुरुष, खावली ता. सातारा कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे वाई तालुक्यातील आसरे येथील 1 महिला, कोरेगाव तालुक्यातील वेळू येथील 1 पुरुष, रायघर येथील 1 महिला, शेळकेवाडी येथील 1 पुरुष, सावरी येथील 1 महिला, रायगाव कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे जावली तालुक्यातील सायगाव येथील 1 पुरुष, केळघर येथील 2 महिला व 2 पुरुष, मोरघर येथील 1 महिला यांचा समावेश आहे.