सातारा - राज्यभर शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने आपल्या सुमारे ११ हजार रयत सेवकांना कोविड काळात मदतीचा हात दिला आहे. आर्थिक सहकार्याबरोबरच कोविडबाबत मदत करण्यासाठी ३८ सेवा केंद्रे सुरू करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. अनिल पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
कोविडमध्ये 'रयत' देणार सेवकांना आधार, राज्यात ३८ मदत केंद्रे उभारणार - डाॅ. अनिल पाटील - satara rayat shikshan sanstha latest news
भविष्यात कोविडबाधित विद्यार्थांना आर्थिक मदत देण्याचाही संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेच्या सेवकांनी अर्धा दिवसाचा पगार दिला आहे. सुमारे दीड कोटींचा हा निधी असेल. त्यातून रुग्णाला केलेल्या खर्चापोटी जे शक्य होईल, ती आर्थिक मदत करणार आहोत. आमची मदत साडेचार लाख विद्यार्थांसाठी पुरेशी नाही, याची जाणिव आहे. परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणून ती देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डाॅ. पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले, की "कोविड महामारीमुळे रयत सेवकाला तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यास कोविड सेंटर्स कोणती, बेड - आॅक्सजनची उपलब्धता, इंजेक्शन, रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जाईल. कुटुंबातील पत्नी, मुले यांची सोईनुसार राहण्याची व्यवस्था केली जाईल. रयत सेवकाला मानसिक आधार देणे, मदत मिळवून देणे, त्याच्या कुटुंबीयांना काही मदत लागल्यास ती तत्काळ देणे, यासाठी ही सेवा केंद्रे सेवाभावी पद्धतीने काम करतील. रयत बँकेमार्फत सेवकांना ऑनलाईन एक लाख रुपये तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येतील. जेणे करुन सेवक बाधित असल्यास त्यांच्या कुटुंबीयांची अबाळ होणार नाही.
भविष्यात कोविडबाधित विद्यार्थांना आर्थिक मदत देण्याचाही संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेच्या सेवकांनी अर्धा दिवसाचा पगार दिला आहे. सुमारे दीड कोटींचा हा निधी असेल. त्यातून रुग्णाला केलेल्या खर्चापोटी जे शक्य होईल, ती आर्थिक मदत करणार आहोत. आमची मदत साडेचार लाख विद्यार्थांसाठी पुरेशी नाही, याची जाणिव आहे. परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणून ती देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डाॅ. पाटील यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय व तांत्रिक जबाबदारी घेणारे कोणी पुढे आले तर कोविड रुग्णांसाठी बेडची सोय म्हणून संस्थेच्या हॉस्टेलच्या इमारती उपलब्ध करुन देण्याची तयारीही डाॅ. पाटील यांनी दर्शविली. आत्ता १९० इमारती कोविड उपचारांच्या अनुशंगाने वापरसाठी शासनाला दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "आमच्यासारखं प्रत्येक संस्थेने आपल्या सेवकांसाठी काम उभे केले तर या सर्व यंत्रणा एकमेकांना मदत करुन सरकारला एक समांतर मदतीची व्यवस्था उभी राहू शकते" असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
रयत सेवकांकडून पावणेतीन कोटी सीएम फंडाला मदत
कोविड साथरोगाशी मुकाबला करण्यासाठी रयत सेवकांनी एक दिवसाचा पगार सुमारे २ कोटी ७६ लाख रुपये आजच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने दिले असल्याचे डाॅ. अनिल पाटील यांनी सांगितले.