सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करताना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची जीभ घसरली आहे. साताऱ्यातील ३ कुत्री पिसाळलेली आहेत, त्यांना आवरा अन्यथा आपणही पिसाळलेले राजकारण करु असा इशारा रामराजेंनी दिला आहे. नीरा देवघर पाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्याला उत्तर देताना आज रामराजेंची जीभ घसरली.
रामराजेंच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नीरा देवघर पाण्यावरुन आता साताऱ्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र सध्या दिसत आहे. उदयनराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रामराजेंनी साताऱ्यात ३ पिसाळलेली कुत्री आहेत, असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली.