महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलोय का, कल्पनाराजेंचा शिवेंद्रराजेंना सवाल - sharad pawar

ज्या शरद पवार साहेबांनी व त्यांच्या पक्षाने ४० वर्षापेक्षा अधिक काळ तुमच्या वडिलांना व तुम्हाला नेतृत्वाची संधी दिली. त्या पवारांना उतारवयात फसवून तुम्ही गद्दारी केली आहे, अशी टीका कल्पनाराजे यांनी शिवेंद्रराजेंवर केली आहे.

राजमाता कल्पनाराजे

By

Published : Aug 2, 2019, 10:10 PM IST

Updated : Aug 2, 2019, 11:45 PM IST

सातारा -माझा काटा काढायचा प्रयत्न झाल्यास काट्याने काटा काढू, असा अप्रत्यक्ष इशारा भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना दिला होता. याला उत्तर देताना काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलोय का? असे वक्तव्य करत आज कल्पनाराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांचा समाचार घेतला.

ज्या शरद पवार साहेबांनी व त्यांच्या पक्षाने ४० वर्षापेक्षा अधिक काळ तुमच्या वडिलांना व तुम्हाला नेतृत्वाची संधी दिली. त्या पवारांना उतारवयात फसवून तुम्ही गद्दारी केली आहे. गद्दारीचा हा इतिहास तुम्हाला नवा नाही आणि तरीही तुम्ही काट्याने काटा काढायची भाषा करता? काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलोय का? याद राखा पुन्हा असली भाषा कराल तर येणाऱ्या निवडणुकीत कुणाचा काटा निघेल हे तुम्हाला समजेलच, असे म्हणत कल्पनाराजे यांनी शिवेंद्रराजेंवर टीका केली.

त्या पुढे म्हणाल्या, जरा इतिहास तपासून घ्या, जुन्या गोष्टी आठवा. तुम्हाला व तुमच्या वडिलांना जे काही मिळाले ते आमच्यामुळे हे तुम्ही एवढ्या लवकर विसरता. १९९६ ला तुमच्या वडिलांनी सतीश जाधव यांना उदयनराजेंकडे पाठवले. मला आमदारकीला मदत करा, मी तुम्हाला खासदारकीला मदत करतो, असा शब्द अभयसिंहराजेंनी दिला. मात्र, तो न पाळता अभयसिंहराजेंनी आमदारकीला उदयनराजेंचा उपयोग करुन घेतला आणि खासदारकीला त्यांना फसवले. त्यामुळेच जाधव तुम्हाला तुटले. अभयसिंहराजेंनी उदयनराजेंना अनेकदा फसवले. तीच परंपरा तुम्ही चालवत आहात.

नगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या पत्नीचा झालेला पराभव आजही तुम्हाला झोंबतो. मग तुम्ही १९९९ साल कसे विसरता? आणि आम्हाला कसे विसरायला लावता? राजवाड्याच्या बाहेर काय तुम्हाला विचारुन पडायचे का? सातारा जिल्ह्याच्या सामाजिक वाटचालीत मी नेहमीच लोकांबरोबर राहिले आहे. शरद पवार यांच्यासह मोठ्या राजकीय नेत्यांना मी यापूर्वीही अनेकदा भेटले आहे. राजघराण्याची भाषा करता आणि वडीलधाऱ्यांच्या संदर्भाने कसे बोलावे याचे तारतम्य तुम्हाला नाही का? याद राखा पुन्हा असे काही बोलाल तर? उदयनराजेंचे बंधूप्रेम तुम्हाला तुमची निवडणूक आली की आठवले. १९९९ ला बंधू नाही तुम्हाला बंदूक आठवत होती आणि आता तर काट्याने काटा काढायची भाषा करता. येणाऱ्या निवडणुकीत कुणाचा काटा निघणार आहे, हे जनतेने ठरवले आहे, असे वक्तव्य कल्पनाराजे यांनी केले.

Last Updated : Aug 2, 2019, 11:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details