महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात जोरदार पाऊस, चारा छावण्यांना फटका - चारा छावण्या

साताऱ्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे दुष्काळी भागात जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

पावसामुळे चारा छावण्यांचे झालेले नुकसान

By

Published : Jun 11, 2019, 10:21 AM IST

सातारा -शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दुष्काळी भागात जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्यावरील छते उडून गेली. तसेच वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले.

पावसामुळे चारा छावण्यांचे झालेले नुकसान

जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस तासभर सुरू होता. यामुळे बामनोली, रहिमतपूर, मेढा, पाचवड, नागठाणे, औंध याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुसरीकडे शहरातील घरांमध्ये पाणी शिरले होते तर रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले.

वादळी वाऱ्यामुळे दुष्काळी भागात जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्यावरील छते उडून गेली. यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट उभे राहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details