महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाई जवळ जुगार अड्ड्यावर छापा, सुमारे ८६ लाखांच्या मुद्देमालासह १४ जणांना अटक - gambling den news

वेरुळी (ता. वाई जि. सातारा) गावाच्या हद्दीत कुकुरांजाणा नावाच्या शिवारात राजेश श्रीगिरी यांच्या मालकीच्या बंगल्यात तीन पानी, पैशावर जुगार खेळला जात असल्याची खात्री होताच छापा टाकूण १४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ७१ हजार ८० रुपये, टेबल खुर्च्या, ५ आलिशान गाड्या असा एकूण ८६ लाख २५ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व १४ लोक हे उच्चभ्रू असून ते सर्वजण पुणे व सातारा येथून त्यांच्या पाच अलिशान गाड्यांमधुन केवळ जुगार खेळण्यासाठी आले असल्याचे निष्पन्न झाले.

Raids on gambling den 86 lakh confiscated at wai satara
वाई जवळ जुगार अड्ड्यावर छापा, सुमारे ८६ लाखांच्या मुद्देमालासह १४ जणांना अटक

By

Published : Jul 14, 2020, 8:08 AM IST

सातारा- सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वाईजवळ एका बंगल्यात सुरु असलेल्या तीन पानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर रविवारी रात्री छापा मारला. यात ५ आलिशान मोटारी व रोख रक्कम असा ८६ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय सातारा व पुणे जिल्ह्यातील हायप्रोफाईल १४ जणांना यात अटक करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील यांना खास बातमीदारामार्फत गोपणीय माहिती मिळाली. वेरुळी (ता. वाई जि. सातारा) गावाच्या हद्दीत कुकुरांजाणा नावाच्या शिवारात राजेश श्रीगिरी यांच्या मालकीच्या बंगल्यात तीन पानी, पैशावर जुगार खेळला जात असल्याची खात्री होताच छापा टाकूण १४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ७१ हजार ८० रुपये, टेबल खुर्च्या, ५ आलिशान गाड्या असा एकूण ८६ लाख २५ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व १४ लोक हे उच्चभ्रू असून ते सर्वजण पुणे व सातारा येथून त्यांच्या पाच अलिशान गाड्यांमधुन केवळ जुगार खेळण्यासाठी आले असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना पुढील कारवाईसाठी वाई पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

सर्जेराव पाटील माहिती देताना...


राजेश जनार्धन श्रीगिरी (वय ५१ वर्षे, रा. १७८४/२३. सेंटर स्ट्रीट कॅम्प भोपळा चौक, पुणे, सध्या रा वेरुळी ता वाई जि सातारा), अमित श्रीकांत सुबंध (वय-४० रा. फातिमा नगर, पुणे), सुरेश फुलभागर (वय ५५, रा. ६६६, ताबुत स्ट्रीट, कॅम्प पुणे), कांतीलाल ज्ञानेश्वर पवार (वय-५४ रा. डीएम रोड, कॅम्प पुणे), शंकर बळीराम परदेशी (वय-५५ रा. स.नं. ५०, भाग्योदय नगर, कोंडवा, पुणे. ४८), ललीत सोमलाल मेश्राम (वय-३० रा. कृषीरत्न हौसींग सोसायटी महात्मा फुलेनगर सेक्टर १८, चिंचवड, पुणे १९), रविंद्र नामदेव शिंदे (वय ४५ रा. एकसळ ता कोरेगांव जि.सातारा), गुलाब उत्तम भंडलकर, (वय ३७, रा. गुणवरे, ता. फलटण जि.सातारा), अभिजीत भिमराव सोनवने (वय ४२, रा. स.नं ४७, जाधववस्ती घोरपडीगांव पुणे), सुभाष विठ्ठल मिरगल (वय ५४, रा. बाबाजण चौक, भिमपुरा पुणे), अनिल शंकर चिकोटी ( वय ५३, रा. न्यु मोदी खाणा, कॅम्प पुणे), सिराज उस्मान धामनकर (वय ४१, रा. बाबाजाण दर्गा कॅम्प भिमपुरा पुणे), मनोज अशोक आडके (वय ३२, रा.ठाकुरकी फलटण, ता. फलटण, जि.सातारा) व गणेश सुरेश शिवशरण (वय २६, रा. स.नं २१४. दांडेकर पुल. पुणे-३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ही कारवाई वरीष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक निरिक्षक आनंदसिंग साबळे, आनंदराव भोईटे, सुधीर बनकर, मुबीन मुलाणी, शरद बेबले. नितीन गोगावले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, वैभव सावंत व चालक संजय जाधव व पंकज बेसके, महिला पोलीस मोना निकम, विद्याताई पवार, नुतन योडरे यांनी केली.


हेही वाचा -सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन शिकाऱ्यांना अटक; बंदुकीसह काडतुसे जप्त

हेही वाचा -अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत; कोरेगाव तालुक्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details