महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Contractor Suspected Suicide : पुण्यातील बेपत्ता ठेकेदाराची नीरा नदीत आत्महत्या? सारोळा पुलावर आढळली चप्पल - possibility of jumping into Neera river basin

पुण्यातील ई कचरा उचलणारे ठेकेदार विजय परशुराम सुनगार (वय ३७, रा. जांभूळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) हे दि. १६ नोव्हेंबरपासून बेपत्ता ( E Garbage Contractor Vijay Sungar) आहेत. त्यांची कार एका हॉटेलसमोर आणि चप्पल सारोळा पुलावर आढळून आल्याने ठेकेदाराने नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय आहे. शिरवळ रेस्क्यू टीम आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने नीरा नदीपात्रात शोधमोहीम सुरू ( Search operation in Neera river basin )आहे.

suicide  contractor
बेपत्ता ठेकेदार

By

Published : Nov 21, 2022, 12:43 PM IST

सातारा :पुण्यातील ई कचरा उचलणारे ठेकेदार विजय परशुराम सुनगार (वय ३७, रा. जांभूळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) हे दि. १६ नोव्हेंबरपासून बेपत्ता ( E Garbage Contractor Vijay Sungar) आहेत. त्यांची कार एका हॉटेलसमोर आणि चप्पल सारोळा पुलावर आढळून आल्याने ठेकेदाराने नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय आहे. शिरवळ रेस्क्यू टीम आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने नीरा नदीपात्रात शोधमोहीम सुरू ( Search operation in Neera river basin )आहे.

कार आणि पुलावर आढळली चप्पल :विजय सुनगार हे ई-कचऱ्याचे ठेकेदार आहेत. दि. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान मोबाईल बंद करून घरात काहीही न सांगता ते निघून गेले होते. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. रात्री उशीरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी विजय सुनगार बेपत्ता झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला नोंद केली. त्यांची कार (क्र.एम. एच. १२ सी. के. ४४३६) ही एका प्रसिद्ध हॉटेलसमोर आढळून आली. तसेच सारोळा पुलावर मध्यभागी त्यांची चप्पल सापडली. विजय सुनगार यांनी सारोळा पुलावरून नीरा नदीपात्रात उडी मारल्याची शक्यता व्यक्त करून पोलिसांनी त्यांचा नदीपात्रात शोध सुरू केला ( possibility of jumping into Neera river basin ) आहे.

नीरा नदीपात्रात शोधमोहीम सुरू :भारती विद्यापीठ पोलिसांनी बेपत्ता ठेकेदाराचा शोध घेण्यासाठी शिरवळ रेस्क्यू टीम आणि स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली आहे. रविवारी रात्री उशीरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली(Suspected committed suicide in Neera river ) आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आहेत. अद्याप बेपत्ता ठेकेदाराचा शोध लागलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details