सातारा Pune Banglore Highway Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडनजीक शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला वॅगनर कारनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात (Car Accident News) झाला आहे. मृतांमध्ये कोल्हापूर पोलीस दलातील एका पोलिसासह त्याची बहिण आणि भाच्याचा (Kolhapur Police Constable Died On Spot) समावेश आहे. अपघातात वॅगनर कारचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी आणि कारमध्ये रक्ताचा सडा पडला होता.
उभ्या ट्रकला कारची पाठीमागून धडक : घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड (ता. कराड) गावच्या हद्दीत बंद पडलेला ट्रक महामार्गाच्या कडेला उभा होता. यावेळी कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणार्या वॅगनर कारनं (क्र. एम. एच. 01 ए. एल. 5458) उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.
भाऊ-बहिण आणि भाच्याचा मृत्यू :या अपघातात कारमधील दोन पुरूष आणि एक महिला जागीच ठार झाले. नितीन पोवार (रा. कोल्हापूर), मनीषा आप्पासाहेब जाधव, अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), अशी मृतांची नावे आहेत. दोघे भाऊ-बहिण होते. भाच्याचे नाव समजू शकले नाही. सर्वजण कोल्हापूरहून पुण्याकडे चालले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतांमधील नितीन पोवार हे कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गोपनीय विभागात कार्यरत होते.