कराड (सातारा) - रेल्वे स्थानकातील ओव्हर हेड वायरला लोंबळकत मनोरुग्णाने स्टंटबाजी केली. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. रंगपंचमी खेळणार्या युवकांनी तातडीने या मनोरुग्णाला खाली उतरवून चोप दिला. सुदैवाने वीज प्रवाह बंद होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. संबंधित व्यक्ती बिहारी असल्याचे समजते. तसेच दोन दिवसांपासून तो रेल्वेस्थानक परिसरात फिरत होता. रेल्वे पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
कराड रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरला लोंबकळत मनोरुग्णाची स्टंटबाजी - कराड रेल्वे स्थानक बातमी
ओव्हर हेड वायरला लोंबळकत मनोरुग्णाने स्टंटबाजी केली. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. रंगपंचमी खेळणार्या युवकांनी तातडीने या मनोरुग्णाला खाली उतरवून चोप दिला. सुदैवाने वीज प्रवाह बंद होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
रंगपंचमी दिवशी (शुक्रवारी) दुपारी एक मनोरुग्ण कराड रेल्वे स्थानकावरील ओव्हर हेड वायरवर चढला. वायरला लोंबकळत तो स्टंटबाजी करत होता. ही घटना रंगपंचमी खेळणार्या मुलांनी पाहिली. काही युवकांनी त्याला शिडी लावून खाली उतरवले. तसेच त्याला चोपही दिला. या खळबळजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने वीज प्रवाह सुरू नव्हता, त्यामुळे दुर्घटना टळली.
मिरज-पुणे दरम्यानच्या रेल्वे मार्गावर ओव्हर वायर टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील विद्युत प्रवाह बंद होता. त्यामुळे ओव्हर वायरवर चढलेल्या मनोरुग्णाचे प्राण वाचले. गेल्या दोन दिवसांपासून तो रेल्वे स्थानक परिसरात फिरत होता. लोकांना त्रासही देत होता. परंतु, मनोरुग्ण असल्याने नागरिकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रंगपंचमी दिवशी त्याने केलेल्या स्टंटमुळे रेल्वे कर्मचार्यांचे धाबे दणाणले. मनोरुग्णाजवळ एक बॅगही सापडली आहे. तो बिहारी असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे पोलीस त्याची चौकशी करत आहेत.