महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाबळेश्वर; सैनिक स्कूल विकासासाठी अर्थ संकल्पात तरतूद - उपमुख्यमंत्री अजित पवार - ajit pawar latest news

सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या प्रारूप आराखड्यात 110.50 कोटी वाढ करून 375 कोटी रुपयाच्या निधीच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Feb 12, 2021, 6:39 PM IST

सातारा - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या सैनिक स्कूल इमारती व इतर कामांसाठी तसेच महाबळेश्वरच्या विकासासाठी वेगळ्या निधीची तरदूत अर्थ संकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्ह्यासाठी 110 कोटींचा वाढीव निधी

सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या प्रारूप आराखड्यात 110.50 कोटी वाढ करून 375 कोटी रुपयाच्या निधीच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजना 2021-22 (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी होते.

वृक्ष संवर्धनासाठी मनरेगाचा निधी

सातारा जिल्ह्यात वन विभागाने पॅगोडाचे काम अतिशय उत्तम करावे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, आत्तापर्यंत वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी वेळोवेळी वृक्षरोपन करण्यात आले आहे. या वृक्ष जगविण्यासाठी मनरेगाचा निधी वापरावा. स्मशानभूमीतील पत्र्यांचे शेड हे वारा, पाऊस व ज्वालामुळे खराब होऊ शकतात त्यामुळे स्मानशभूमतील शेड कायम स्वरुपी रहावे यासाठी सिमेंट काँक्रिट स्लॅब टाकावे, अशाही त्यांनी बैठकीत सूचना केल्या.

मेडीकल काॅलेजबाबत लवकरच बैठक

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्याबाबतीत प्रत्येक 15 दिवसांनी वरिष्ठस्तरावर बैठक घेण्यात येईल. या महाविद्यालयाच्या कृष्णानगर येथील जागेवर अतिक्रण होणार नाही तसेच तेथील झाडे तोडली जाणार नाहीत यावर लक्ष द्या,असे कोणी केलेले आढळले तर त्यावर कडक कारवाई करावी. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे तसेच पालकमंत्री यांनी वेळोवेळी भेटी देऊन आढावा घ्यावा अशी सूचनाही त्यांनी केली.

महाबळेश्वरचा विकास

पर्यटनाचा चालना देण्यासाठी महाबळेश्वरचा विकास, राज्यासह देशात सातारा सैनिक स्कूलचा नाव लौकीक वाढावा यासाठी इमारत, इतर सुविधा व सुशोभीकरणासाठी तसेच शासकीय विश्रामगृहात देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुद करण्यात येणार असल्याचेही वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. यावेळी आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांनी विकासाबाबत मुद्दे उपस्थितीत केले.

बैठकीला सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, अतिरिक्त मुख्य सचिव देबाषीश चक्रवर्ती, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details