सातारा -जिल्ह्यातील राजकारण आज पुन्हा एकदा उफाळून निघाले आहे. संजय राऊत यांनी काल केलेल्या वक्तव्याचे पडसाद तीव्र पडसाद शहरात दिसून येत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शहरात संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या पाट्या गाढवाच्या गळ्यात घालून पवई नाका येथे मिरवणूक काढण्यात आली. बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार शहर बंदला प्रतिसाद मिळत आहे.
उदयनराजेंवरील टीकेनंतर साताऱ्यात बंद, गाढवांच्या गळ्यात राऊत-आव्हाडांच्या पाट्या बांधून निषेध - jitendra awhad
खासदार संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचे सातारा शहरामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. काही वेळा पूर्वी शहरातील दुकाने बंद करण्यात आली आहेत.
उदयनराजेंवरील टीकेनंतर साताऱ्यात बंद, गाढवांच्या गळ्यात राऊत-आव्हाडांच्या पाट्या बांधून निषेध
शहर बंदचा आढावा घेता सातारा शहाराव्यतिरिक्त कुठेही या बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचे आमच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. मात्र, काही वेळा पूर्वी शहरात दुकाने बंद करण्यात आली आहेत.
हेही वाचा - 'संजय राऊतांच्या विधानाने सर्वांची मान खाली गेली, या माणसाच्या बुद्धीला काय झाले?'
Last Updated : Jan 16, 2020, 12:41 PM IST