महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाईच्या पसरणी घाटात खासगी ट्रॅव्हल्स-शिवशाही बसचा भीषण अपघात; 27 जण जखमी तर 4 गंभीर - खासगी ट्रॅव्हल्स आणि शिवशाही बसचा भीषण अपघात

वाई घाटात बुवासहेब मंदिराजवळ खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही बस शिवशाही बस वर जावून धडकली. या भीषण अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

satara
वाईच्या पसरणी घाटात खासगी ट्रॅव्हल्स आणि शिवशाही बसचा भीषण अपघात

By

Published : Dec 9, 2019, 4:38 PM IST

Updated : Dec 9, 2019, 5:37 PM IST

सातारा - लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि शिवशाही बसचा वाईच्या पसरणी घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 27 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पसरणी वरून लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचा ताबा सुटल्याने घाटामधील एका वळणावर ट्रॅव्हल्स पलटी होऊन शिवशाही बस वरती धडकल्याने हा अपघात झाला.

वाईच्या पसरणी घाटात खासगी ट्रॅव्हल्स आणि शिवशाही बसचा भीषण अपघात

हेही वाचा -अजित पवार व फडणवीस साडे तीन दिवसांच्या सत्तास्थापनेनंतर पुन्हा एकत्र; पवार म्हणतात..

वाई घाटात बुवासहेब मंदिराजवळ खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही बस शिवशाही बस वर जावून धडकली. या भीषण अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने वाई येथील ग्रामीण रुगणालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. यामध्ये 27 प्रवासी जखमी असून ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Last Updated : Dec 9, 2019, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details