सातारा- महाराष्ट्राच्या जनतेसमोर अतिवृष्टीच्या रुपात मोठे संकट ऊभे ठाकले आहे. राज्याला स्थिर सरकार हवे आहे. परंतु, याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे राज्यापालांनी सुत्रे आपल्या हातात घ्यावीत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
राज्यपालांनी राज्याची सूत्रे हाती घ्यावीत- पृथ्वीराज चव्हाण - सातारा LATEST NEWS
सत्ताधारी आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यांना सरकार स्थापनेत रस दिसत नाही, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला आहे. राज्यातील जनतेसमोर अतिवृष्टीचे मोठे संकट आहे. त्यामुळे राज्यपालांनी धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकर्यांना मदतीचा दिलासा द्यावा. खरिपाची पिके उध्दवस्त झाली आहेत. रब्बीची पेरणी झालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. सत्ताधार्यांनी तातडीने सरकार स्थापण करण्याचा निर्णय घेऊन शेतकर्यांना मदत करावी
सत्ताधारी आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यांना सरकार स्थापनेत रस दिसत नाही, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला आहे. राज्यातील जनतेसमोर अतिवृष्टीचे मोठे संकट आहे. त्यामुळे राज्यपालांनी धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकर्यांना मदतीचा दिलासा द्यावा. खरिपाची पिके उध्दवस्त झाली आहेत. रब्बीची पेरणी झालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. सत्ताधार्यांनी तातडीने सरकार स्थापण करण्याचा निर्णय घेऊन शेतकर्यांना मदत करावी, असेही चव्हाण म्हणाले आहेत. भाजप जबाबदार राजकीय पक्ष आहे. राज्यातील जनतेने त्यांना मत दिले आहे. त्यांनी जबाबदारी घेत महाराष्ट्रातील जनतेचे उत्तरदायीत्व स्वीकारायला हवे. सत्ताधारी पक्ष काय करतोय याची वाट बघू. त्यानंतर काय पेचप्रसंग निर्माण होतो आणि त्यावर राज्यपाल काय निर्णय घेतात, त्यावरच पुढील निर्णय अवलंबून असेल, असेही ते म्हणाले आहेत.