सातारामाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण व नूतनीकरण केले जावे, अशी मागणी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली ही मागणी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण व नूतनीकरण केले जावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ए आर अंतुले यांनी उभारली स्मारकेमाजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी राज्यात हुतात्मा स्मारकांची उभारणी केली होती. सध्या या स्मारकांची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या स्मारकांचे सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी tweet सुद्धा केले आहे.
हुतात्मा स्मारकांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्षसुमारे ५० वर्षापर्वी राज्यात अनेक ठिकाणी हुतात्म्यांची स्मारके महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात आली आहेत. सद्य परिस्थितीमध्ये स्मारकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. स्मारकांची देखमाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनास दिली आहे. परंतृ, प्रशासनाकडून हुतात्मा स्मारकांची योग्य निगा राखली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मारकांचे नुतनीकरण व सुशोभिकरण करणे आवश्यक असल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.