कराड (सातारा) -बाळासाहेब थोरात यांच्या जबाबदारीचे विभाजन होईल की नाही हे येत्या चार-पाच दिवसांत स्पष्ट होईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कराडमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबतचा निर्णय चार-पाच दिवसात - पृथ्वीराज चव्हाण - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदा बद्दल बातमी
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदा बद्दल चार ते पाच दिवसात निर्णय होईल असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते कराड येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते.

काँग्रेसमध्ये 'एक नेता, एक पद', अशी संकल्पना आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधानसभा गटनेतेपद, प्रदेशाध्यक्षपद आणि महसूल मंत्रीपद, अशी तीन पदे आहेत. त्यामुळे कोणत्याही एका पदाला योग्य पद्धतीने न्याय देता येत नाही, असे काहींचे म्हणणे होते. 'एक नेता, एक पद', याबाबत काँग्रेसमध्ये विचार सुरू असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी आमदारांची मते जाणून घेतली आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत ठोस निर्णय होईल की नाही, हे आपण सांगू शकत नाही. राहुल गांधी आल्यानंतरण चार-पाच दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे चव्हाण म्हणाले.
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर मला विधानसभा सभापती पदावर विचारणा करण्यात आली होती. मात्र, सक्रिय राजकारण आणि मतदारसंघात जास्त वेळ देता आला नसता त्यामुळे आपण सभापती पद नाकारले होते, असा खुलासाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.