महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल गांधींची न्याय यात्रा देशातील अन्यायाविरोधात लोकचळवळ उभी करेल - पृथ्वीराज चव्हाण - भारत जोडो न्याय यात्रा

Prithviraj Chavan : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या स्टिकरचं अनावरण केलं. त्यांनी आपल्या वाहनाला स्टिकर लावून या यात्रेत सहभाग नोंदवला.

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 10:37 PM IST

सातारा Prithviraj Chavan : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या संदर्भात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा अन्यायाविरोधात लोक चळवळ उभी करेल, असं ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या स्टिकरचं अनावरण करत न्याय यात्रेत आपला सहभाग नोंदविला. त्यावेळी ते बोलत होते.

अन्यायाच्या विरोधात जन आंदोलन : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा प्रचंड यशस्वी ठरली. त्यानंतर ते देशातील अन्याया विरोधात जनआंदोलन उभं करत आहेत. त्यासाठीच त्यांची न्याय यात्रा आहे. या यात्रेची सुरुवात मणिपूरची राजधानी इंफाळजवळील थोबल येथून झाली. राहुल गांधींसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य तसेच खासदार या यात्रेत सहभागी झाले आहेत. ही यात्रा १५ राज्यांतल्या १०० जिल्ह्यांतून जवळपास ६५०० किमीचं अंतर पार करणार आहे.

पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या धोरणावर टीका करतात. आताही राम मंदिर प्रतिष्ठापना, घराणेशाही यावरून त्यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीत कोणताही मुद्दा नसल्यानं राम मंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. हा धार्मिक कार्यक्रम आहे की राजकीय? असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर कोंडीत पकडलं : चीननं आक्रमण करून भारताचे 20 सैनिक मारले. भारतीय हद्दीत छावण्या उभारल्या. यावर मोदी काहीच बोलत नाहीत. संसदेत कोणीही घुसतंय. त्यामुळे मोदींचा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही फेल गेल्याचं सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलंत का :

  1. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात
  2. मिलिंद देवरांसह 'हे' जिवाभावाचे नेतेही सोडून गेले राहुल गांधींची साथ, जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details