सातारा - कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवासाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
कोरोनामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवासाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा मंगळवारी (दि. 17) वाढदिवस आहे. या निमित्ताने काही कार्यक्रम आयोजीत करण्यात आले हाेते. मात्गर, सध्या जगभरात कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रूग्ण आढळले आहे. याचा वाढता प्रभाव पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या त्यांनी आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा संशयीत रूग्ण आढळून आला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खाजगी, शासकीय, गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शाळा-महाविद्यालये, यात्रा-जत्रा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
आमदार पृथ्वीराज चव्हाण हे सध्या परगावी असून ते वाढदिवसाच्या दिवशी कराडमध्ये येऊ शकणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करू नये याची नोंद कार्यकर्त्यांनी घेण्याचे आवाहन कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे.