सातारा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी कराडमधील नवीन विश्रामगृहाचे उद्घाटन होत आहे. तब्बल २२ कोटी २२ लाख रूपये खर्चून बांधण्यात आलेले नवीन विश्रामगृह एखाद्या अलिशान हॉटेलपेक्षा कमी नाही. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१३ मध्ये विश्रामगृहाच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यांना मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाची संधी मिळाली नाही. मात्र, सातारा जिल्ह्याचेच सुपूत्र असलेल्या एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होत असल्याने हा कार्यक्रम पक्षातीत ठरणार आहे.
ग्रामीण भागातील सर्वात भव्य विश्रामगृह -पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी नवीन विश्रामगृहाला मंजुरी दिली होती. बांधकामाला तब्बल २२ कोटी २२ लाख रूपये खर्च झाला आहे. सर्व सोयीसुविधा असलेले हे विश्रामगृह एखाद्या अलिशान हॉटेलसारखे असून ग्रामीण भागात एवढे भव्य असणारे हे राज्यातील एकमेव विश्रामगृह आहे. जुन्या विश्रामगृहाची देखील डागडुजी करण्यात आली आहे.