'सामाजिक मूल्य लक्षात घेऊन सज्जनगड देवस्थान सुरू करा' - sajjangad temple satara
सरकारने सरसकट सर्व देवस्थान बंद ठेवले, हे योग्य नाही. धार्मिकस्थळांचे सामाजिक मूल्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ही देवस्थाने सुरू करावीत, अशी मागणी रामदास स्वामी यांच्या वंशजांनी केली आहे.
सातारा - समाजाला लागणारे आत्मबल, मन:शांती हे या देवस्थानच्या माध्यमातून मिळते. नैतिकमूल्ये, सेवाभाव, सामाजिक भान याबाबतच्या चेतना धार्मिकस्थळीच मिळत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही देवस्थाने सुरू करावीत, अशी मागणी रामदास स्वामी यांच्या वंशजांनी केली आहे. सज्जनगडावरील रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष सूर्याजी स्वामी ऊर्फ बाळासाहेब स्वामी यांनी ही मागणी केली आहे.
सज्जनगडावरील समर्थ रामदास स्वामी संस्थानला गेल्या 350 वर्षांपासूनची परंपरा आहे. महाराष्ट्रतच नव्हे तर, महाराष्ट्राच्या बाहेरील व देशातील तसेच परदेशातील देखील या संस्थानाबद्दल लोकांना श्रद्धा आहे. अशी देवस्थाने कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. ती उघडण्याचा सरकारचा काही मानस नाही, हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.