महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात सिद्धनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षाने चक्क रिव्हॉल्वरचा धाक दाखवून प्रोसिडींग पळवले - संस्थेचे व्यवस्थापक रणजित पोळ यांचे निलंबन

सिद्धनाथ पथसंस्थेच्या मासिक सभेत अध्यक्ष सुनिल पोळ यांनी ३१ ऑगस्ट रोजी संचालक मंडळाच्या मासिक बैठकीतून संस्थेचे इतिवृत्त (प्रोसिडींग) रिव्हाॅलव्हरचा धाक दाखवून सर्व संचालकांदेखत पळवून नेले.

साताऱ्यात सिद्धनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षाने चक्क रिव्हॉल्वरचा धाक दाखवून प्रोसिडींग पळवले

By

Published : Sep 7, 2019, 7:05 AM IST

सातारा -जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणाऱ्या सिद्धनाथ पथसंस्थेच्या मासिक सभेत अध्यक्ष सुनिल पोळ यांनी ३१ ऑगस्ट रोजी संचालक मंडळाच्या मासिक बैठकीतून संस्थेचे इतिवृत्त (प्रोसिडींग) रिव्हाॅलव्हरचा धाक दाखवून सर्व संचालकांदेखत पळवून नेले. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

साताऱ्यात सिद्धनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षाने चक्क रिव्हॉल्वरचा धाक दाखवून प्रोसिडींग पळवले

हेही वाचा - मजबूत विरोधी नेत्यांचीही महाराष्ट्राला गरज, राजे भाजपात जाऊ नका - राजू शेट्टी

अध्यक्ष सुनिल पोळ व संचालिका निलिमा पोळ यांची बेकायदेशीर कर्जप्रकरणे नाकारली होती. तसेच सहकार राज्यमंत्री यांच्या पुढे दोघांचे संचालक पद रद्द होण्याबाबत केस चालू आहे. तसेच सहकार आयुक्त पुणे यांचेकडे संस्थेच्या संचालक व सेवकांनी या दोघांविरुध्द बेकायदेशीर काम केल्याची तक्रार केली आहेत. लेखा परिक्षण अहवालात संस्थेच्या अध्यक्षांचे कामकाज समाधानकारक नाही. असा शेरा देखील ठेवण्यात आला आहे. संस्थेचे व्यवस्थापक रणजित पोळ यांचे निलंबन अध्यक्ष सुनिल पोळ यांनी केले होते. ते बेकायदेशीर आहे व रणजित पोळ हे यापुढेही व्यवस्थापक म्हणून काम पाहतील अशी माहिती संचालक नारायण माने यांनी दिली. अशा सर्व कारणांमुळे पोळ घाबरला होता. आता सगळ चव्हाट्यावर येईल म्हणुन पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाच धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - लाच पडली महागात, तलाठ्याला तीन वर्षे सक्त मजुरी

हेही वाचा - सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्यासाठी लढा सुरूच राहणार - पृथ्वीराज चव्हाण

ABOUT THE AUTHOR

...view details