महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Crime : माजी आमदारांच्या बंगल्याच्या आवारात सापडलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन, डीएनएचा घेतला नमुना - Satara Crime

भाजपच्या माजी आमदार कांता नलावडे ( Former MLA Kanta Nalawade ) यांच्या बंगल्याच्या आवारात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन ( Post mortem of the body ) करण्यात आले आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालात संबंधिताचा मृत्यू कसा झालाय, हे स्पष्ट होईल. दरम्यान, ओळख पटण्यासाठी डीएनए नमुना देखील घेण्यात आला आहे.

A DNA sample was taken
डीएनएचा घेतला नमुना

By

Published : Jan 1, 2023, 10:16 PM IST

सातारा -भाजपच्या माजी आमदार कांता नलावडे ( Former MLA Kanta Nalawade ) यांच्या बंगल्याच्या आवारात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन ( Post mortem of the body ) करण्यात आले आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालात संबंधिताचा मृत्यू कसा झालाय, हे स्पष्ट होईल. दरम्यान, ओळख पटण्यासाठी डीएनए नमुना देखील घेण्यात आला आहे.

मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान -माजी आमदार कांता नलावडे यांच्या वाढे (ता. सातारा) येथील बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला होता. याबाबत अद्याप ठोस धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. संबंधिताचा खून झालाय का, हे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल. मात्र, मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मृतदेह पुरूषाचा की महिलेचा हे देखील स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून गोपनीय तपास -सातारा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील लोकांकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हाती ठोस माहिती आलेली नाही. शवविच्छेदन अहवालातून घातपात आहे का, हे स्पष्ट होईल. परंतु, मृतदेह कोणाचा आहे, याची तांत्रिक माहिती समोर येण्यासाठी डीएनएचा नमुना घेण्यात आला असल्याची माहिती घोडके यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details