कराड (सातारा) - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कराड शहर पोलीस ठाण्यातील वाहतूक नियंत्रण शाखा आणि नगरपालिकेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एका दिवसात 1 लाख 88 हजारांचा दंड वसूल केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून मास्कविना फिरणे, दुचाकीवरून डबलसीट आणि चारचाकी गाडीतून तीनपेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे.
कराडमध्ये प्रशासन आक्रमक; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 1 लाख 88 हजारांचा दंड - Satara lockdown violation
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून मास्कविना फिरणे, दुचाकीवरून डबलसीट आणि चारचाकी गाडीतून तीनपेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे.
कराडमध्ये प्रशासन आक्रमक; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 1 लाख 88 हजारांचा दंड
870 जणांवर मोटार वाहन कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1 लाख 88 हजार रूपयांचा दंड वसूल झाला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर राखा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, दुचाकीवरून डबल सीट न फिरू नका, तीनचाकी, चारचाकी वाहनामधून तीनपेक्षा जास्त लोकांची वाहतूक करू नका, अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.