कराड (सातारा) - रस्त्यावर वाढदिवस साजरा करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांवर कराड शहर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी १७ युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. डीवायएसपी सुरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कराडमध्ये रस्त्यावर वाढदिवस साजरा करणारे १७ युवक पोलिसांच्या ताब्यात - कराड पोलीस न्यूज
सैदापूर-विद्यानगर येथे रस्त्यावर वाढदिवस साजरा करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. डीवायएसपी सुरज गुरव यांच्या पथकाने कारवाई करत १७ युवकांना ताब्यात घेतले आहे.
सैदापूर-विद्यानगर येथे रस्त्यावर वाढदिवस साजरा होत असल्याची माहिती डीवायएसपी सुरज गुरव यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकाला संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांसह वाढदिवसामध्ये सहभागी असणाऱ्या युवकांची उचलबांगडी करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. बहुतांशी युवक अल्पवयीन असल्याने त्यांना केवळ समज देऊन सोडण्यात आले.
रस्त्यावर वाढदिवस साजरा करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या. संबंधितावर निश्चित कारवाई केली जाईल, अशी ग्वाही डीवायएसपी सुरज गुरव यांनी दिली.