सातारा - निरा ते लोणंद मार्गावर लोणंद पोलिसांनी बेकायदा दारु वाहतुक करणारी एक फॉर्च्यूनर कार त्याब्यात घेतली असून, यामध्ये तिघांना अटक केली आहे. धिरज संजय बर्गे (रा. आझाद चौक, कोरेगाव), मयुरेश हनमंत शिंदे (रा. संभाजीनगर कोरेगाव) व योगेश ऊर्फ बाबासाहेब आनंदराव बर्गे (रा. अजिंक्य कॉलनी कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. फॉरच्युनर कार (क्र. एमएच ११ ए.डब्लु ७५२५) ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे देशी दारुचे ३० बॉक्स व बिअरचा एक बॉक्स असा ९३ हजार ४८० रुपये किंमतीचा बेकायदा दारुसाठा आढळून आला आहे.
बेकायदा दारु वाहतुक करणाऱ्या तिघांवर कारवाई, फॉर्च्यूनर कार घेतली ताब्यात
निरा ते लोणंद मार्गावर लोणंद पोलिसांनी बेकायदा दारु वाहतुक करणारी एक फॉर्च्यूनर कार त्याब्यात घेतली असून, यामध्ये तिघांना अटक केली आहे.
गोपनिय माहितीच्या आधारे पाठलाग
लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांना आज लोणंद पोलीस ठाण्याच्या हददीत निरा ते लोणंद रस्त्यावर बेकायदा दारु वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी या माहीतीच्या आधारे सापळा रचला. त्याप्रमाणे पोलीस पथकाने पाठलाग करुन या संशयितांसह फॉर्च्यूनर कार ताब्यात घेवून तपासणी केली असता गाडीत एकुण ३० देशी दारुचे बॉक्स व १ बिअरचा बॉक्स असा ९३ हजार ४८० रुपये किंमतीचा बेकायदा दारुसाठा आढळून आला.
फॉर्च्यूनरताब्यात
पोलीसांनी फॉर्च्यूनर कार, दारुसाठा आणि तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई विशाल वायकर, उपनिरिक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकातील संतोष नाळे, अमोल अडसुळ, महेन्द्र सपकाळ, अभिजित घनवट, फैय्याज शेख यांनी केली. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक संतोष नाळे करीत आहेत.