महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी आमदार प्रभाकर घार्गेसह झेडपी सदस्य मनोज घोरपडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल - sugar factory employee murder case

खटाव-माण (के. एम.) साखर कारखान्यातील अधिकार्‍यास बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी उपनिरीक्षक भरत पाटील यांनी तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील एकूण 6 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे.

माजी आमदार प्रभाकर घार्गेसह झेडपी सदस्य मनोज घोरपडे
माजी आमदार प्रभाकर घार्गेसह झेडपी सदस्य मनोज घोरपडे

By

Published : Mar 12, 2021, 7:46 PM IST

Updated : Mar 12, 2021, 8:16 PM IST

माण(सातारा) - के. एम. साखर कारखान्यातील अधिकार्‍याला बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांच्यासह 20 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

खटाव-माण (के. एम.) साखर कारखान्यातील अधिकार्‍यास बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी उपनिरीक्षक भरत पाटील यांनी तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील एकूण 6 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे. जगदीप थोरात यांच्या खूनप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, वर्णे गटाचे जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, महेश घार्गे, सनी क्षीरसागर, पी. ए. अंजनकुमार, अशोक नलवडे, शेडगे मामा यांच्यासह अज्ञात संशयीतांसह एकूण 20 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

20 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मारहाणीत कर्मचाऱ्याचा मृत्यू

कराड तालुक्यातील गोवारे गावातील जगदीप धोंडीराम थोरात (वय 40) हे पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यामध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत होते. कारखान्यातील साखरेच्या पोत्यांमध्ये अफरातफर झाल्याच्या करणावरून थोरात यांना कारखान्यातील कार्यकारी संचालकाच्या केबीनमध्ये बुधवारी (दि. 10) फायबरच्या पाईप व काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, जगदीप थोरात यांना गुरूवारी पहाटे त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कराड येथील कराड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.


हेही वाचा-विद्यार्थ्यांचे प्रकरण हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग अपयशी -अजित पवार

शवविच्छेदन अहवालावरून खून झाल्याचे स्पष्ट-

जगदीप थोरात यांना जबर मारहाण झाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडेसह अन्य संशयीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आरोपींनाअटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा थोरात यांच्या नातेवाईकांनी घेतला होता. जगदीप थोरात यांचा मृतदेह सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेनासाठी पाठविण्यात आला. यावेळी मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवालही तातडीने घेण्यात आला. त्या अहवालावरून थोरात यांना जबर मारहाण करून त्यांचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.


हेही वाचा-दाऊद इब्राहिमला भारतात आणून फासावर लटकवा; हिंदू सेनेची मागणी

सहा आरोपींना अटक-

शवविच्छेदन अहवाल आणि साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे कराड शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक भरत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून 10 जणांवर खुनाचा गुन्हा झिरो नंबरने दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी हा गुन्हा वडूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे.

हेही वाचा-मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण : एटीएसकडून घटनास्थळी नाट्य रूपांतर

कोण आहेत प्रभाकर घार्गे..?

खुनाचा गुन्हा दाखल झालेले प्रभाकर घार्गे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून बिनविरोध निवडून गेले होते. त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ चार वर्षापुर्वी संपला आहे. 2019 मध्ये खटाव-माण मतदार संघातून विधानसभेसाठी ते इच्छुक होते. परंतु, प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट झाला होता.

घोरपडे हे कराड उत्तरमधून विधानसभेचे होते उमेदवार-

मनोज घोरपडे हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. सातारा तालुक्यातील वर्णे गटातून ते निवडून आले आहेत. 2014 आणि 2019 असे दोन वेळा ते कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरले होते. त्यानंतर माजी आमदार घार्गे आणि घोरपडे यांनी खटाव-माण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग प्रा. लि. या खासगी साखर कारखान्याची स्थापना करून साखर कारखानदारीत प्रवेश केला होता.

Last Updated : Mar 12, 2021, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details