सातारा -कराड उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कराड - मसूर मार्गावर गोवा बनावटीच्या 137 दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. दारुच्या बाटल्यांसह चारचाकी वाहन असा एकूण 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोवा बनावटीच्या दारुसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक - कराड उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई
कराड उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कराड - मसूर मार्गावर गोवा बनावटीच्या 137 दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. दारुच्या बाटल्यांसह चारचाकी वाहन असा एकूण 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कराड तालुक्यातील मसूर-निवडी या मार्गावर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत, असल्याची माहिती कराड उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाकडून या मार्गावर गस्त सुरू होती. यावेळी ओमनी मारुती व्हॅनचा (क्र. एम. एच. 11 ए. डब्लू. 132) संशय आल्याने कार थांबवून वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कारमध्ये फक्त गोवा राज्याकरिता विक्रीसाठी असे लिहलेल्या विदेशी दारुच्या 137 बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दारुच्या बाटल्या आणि दारुची वाहतूक करणारे वाहन, असा 2 लाख 7 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नीलेश शांताराम जाधव, दिलीप किसन जाधव (रा. किवळ, ता. कराड), अजय सुरेश जाधव (रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
कोल्हापूर विभागाचे उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या आदेशानुसार आणि अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेंद्र पाटील, दुय्यक निरीक्षक शिरीष जंगम, प्रताप बोडेकर, रोहित माने, श्रीनिवास पाटील, सचिन बावकर, प्रशांत गायकवाड, विनोद बनसोडे, शंकर बक्केवाड, अमोल खरात, राणी काळोखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.