सातारा- सोमवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून ६७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे देवाचे टाक चोरीप्रकरणी पोलिसांनी एका सराफासह तिघांना अटक केली आहे. अवघ्या ५ तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. सुमित संजय देवरुखकर (वय-२० रा. बसप्पा पेठ, करंजे) आणि आदित्य सतिश गायकवाड (वय-२९ रा. आकाशवाणी झोपडपट्टी) अशी चोरट्यांची नावे आहेत.
शाहूपुरीत सोन्याची चोरी, ५ तासात आरोपी जेरबंद
न्यू इंग्लिश स्कूलजवळ धनंजय डोर्ले यांचे दुकान आहे. दुकानात ग्राहक असल्याचा बहाना करुन गेलेल्या दोन युवकांनी डोर्ले कुटुंबियांचा डोळा चुकवून 67 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे देवाचे टाक चोरुन नेले होते. अवघ्या ५ तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला.
चोरीचे टाक खरेदी करणारा मयुर नारायण बनसोडे (वय-२७, रा.१३५, सदाशिव पेठ) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यू इंग्लिश स्कूलजवळ धनंजय डोर्ले यांचे दुकान आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुकानात ग्राहक असल्याचा बहाना करुन गेलेल्या दोन युवकांनी डोर्ले कुटुंबियांचा डोळा चुकवून 67 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे देवाचे टाक चोरुन नेले होते. यासंबंधी धनंजय डोर्ले यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरु केला.
पोलिसांनी कारंजे परिसरात सापळा लावून अवघ्या ५ तासांत संशयितास पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने साथिदारांच्या मदतीने सोने वितळवले आणि साथिदारांना सोने विक्री करण्यासाठी कमीशन देऊन सोन्याच्या लगडची विक्री केल्याचे सांगितले. त्याच्या साथिदाराने सोन्याची लगड सदाशिव पेठेतील मयुर नारायण बनसोडे या सोनारास विकल्याचे सांगितले. या सोनारास अटक करुन पोलिसांनी चोरीस गेलेली 67 हजार 500 रुपयांची सोन्याची लगड हस्तगत केली. तसेच संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली २५ हजार रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जलदगतीने तपास करुन ५ तासांत गुन्हा उघडकीस आणला. हवालदार हसन तडवी यासंबंधी अधिक तपास करत आहेत.