सातारा -पाच वर्षांच्या बालिकेचे अपहरण व लैंगिक अत्याचार करून तिला फेकून पसार झालेल्या नराधमाला गजाआड करण्यात पोलिसांना ( minor girl physical abuse case ) यश आले. गुन्हा केल्यानंतर जिवाच्या भितीने तो घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांना शरण आला होता. बालिकेवरील अत्याचाराचा गुन्हा उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ( Satara police arrest accused ) अटक केली. संकेत स्वरुप गुजर (वय २६, मूळ रा. रामाचा गोट, सातारा. सध्या रा. तामजाईनगर, सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या नावावर चोरीचे १७ गुन्हे नोंद आहेत.
गेल्या सोमवारी घडलेला प्रकार
पोवईनाका परिसरातून एका व्यक्तीने २१ मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास चार वर्षांच्या मुलीला दुचाकीवरुन पळवून नेले होते. त्यानंतर सातारा तालुक्यातील सोनगावच्या हद्दीत अत्याचार करून चिमुरडीला निर्जनस्थळी सोडून पोबारा केला होता. याबाबत काही ग्रामस्थांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद करून शोध सुरू ( Satara crime news ) केला होता.
हेही वाचा-Criminal Monitoring Scheme Aurangabad : आता गुन्हेगारांवर असणार पोलिसांची करडी नजर; १७ पोलीस ठाण्यात 'गुन्हेगारी निरीक्षण योजना'
तब्बल १३४ सीसीटीव्ही धुंडाळले
या कामी पोलिसांनी तब्बल १३४ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ( CCTV footage of 134 places ) तपासले होते. त्यापैकी एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत संशयित कैद झाला होता. याबाबतचे फुटेजही समाज माध्यमावर ( CCTV footage in social media ) प्रसारित केले होते. गुरुवारी (२४ मार्च रोजी) एका व्यक्तीने समाज माध्यमावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधिताला ओळखत असल्याचे सांगितले. त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे संशयिताचे नाव निष्पन्न झाले.