कराड (सातारा) - जमावबंदी असताना जमाव करून विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणांना मंगळवारी तळबीड (ता. कराड) पोलिसांनी विहिरीवर जाऊन ताब्यात घेतले. तसेच विहिरीपासून गावापर्यंत त्यांना चालवत आणले. मात्र, कारवाई न करता कडक समज देऊन त्यांना सोडले.
लॉकडाऊन काळात पोहायला गेले तरुण... पोलिसांनी घडवली अदद्ल
लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढविण्यात आला आहे. तसेच संचार आणि जमावबंदी कायम आहे. लोकांनी घरातच थांबून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासन करत आहे.
लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढविण्यात आला आहे. तसेच संचार आणि जमावबंदी कायम आहे. लोकांनी घरातच थांबून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासन करत आहे. परंतु, लोक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. तसेच जमावबंदीचा भंग करत आहेत. लोक ज्या ठिकाणी एकत्रित जातात आणि गर्दी करतात, अशा ठिकाणांवर पोलिसांचे लक्ष आहे.
कराड तालुक्यातील वहागावमधील तरुण जमावाने पोहायला गेल्याचे समजले. त्या आधारे पोलीस गावाजवळच्या शेतातील विहिरीवर पोहोचले. विहिरीत पोहणाऱ्या तरुणांना तेथून गावात चालवत आणले. पोलिसांचे सर्वत्र लक्ष आहे, हेच पोलिसांनी ग्रामस्थांना दाखवून दिले. पोहायला गेलेल्या तरुणांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, यापुढे जमावबंदीचा भंग झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी समज देऊन त्यांना सोडले.