कराड (सातारा) - जमावबंदी आणि संचारबंदी लागू असताना मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या कराडमधील तब्बल ८२ जणांना कराड शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी ताब्यात घेतले. संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात आले. दंडाच्या निर्णयासाठी कोर्टाने मंगळवारची तारीख दिली आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 82 जणांवर कराड पोलिसांची कारवाई - satara lockdown
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना कराडच्या विविध भागातून सोमवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कराड शहर पोलिस ठाण्याच्या आवारात आणून बसविण्यात आले होते. नंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना कराडच्या विविध भागातून सोमवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कराड शहर पोलिस ठाण्याच्या आवारात आणून बसविण्यात आले होते. नंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु,दंडाचा निर्णय देण्यासाठी न्यायालयाने उद्याची तारीख दिली आहे.
लॉकडाऊन तसेच जमावबंदी, संचारबंदी आदेशाचा भंग करून नागरिक पहाटे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी मॉर्निंग वॉकच्या ठिकाणी लक्ष ठेवले होते. त्यानुसार सोमवारी पहाटे शहरातील विविध ठिकाणाहून तब्बल ८२ जणांना पोलिसांनी जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेऊन कारवाई केली. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना या कारवाईद्वारे पोलिसांनी इशारा दिला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नागरीकांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, सुट्टीकालीन न्यायालयाने त्यांच्या दंडा बाबतचा निर्णय देण्यासाठी उद्याची (मंगळवार) तारीख दिली आहे.