सातारा -"खंडाळा येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या पाणी परिषदेमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर दगडफेक करुन पाणी परिषद उधळून लावण्याचा कट फलटणमधील एका ज्येष्ठ नेत्याने केला होता. मात्र, अगोदरच या दगडफेकीची कुणकुण लागल्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर पाणी परिषदेस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी खळबळजनक माहिती फलटण येथील स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
खंडाळ्यातील पाणी परिषदेत खासदार नाईक-निंबाळकर यांच्यावर दगडफेकीचा कट - दिगंबर आगवणे
"फलटण तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्याने पुणे जिल्ह्यातील काही गुंडांना सुपारी देवून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गाडीवर दगडफेक तसेच ही परिषद उधळून लावण्याची सुपारी दिली होती." अशी माहिती दिगंबर आगवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गेली १९ वर्षे सातारा जिल्ह्याच्या हक्काचे ७० टीएमसी पाणी बारामतीला केवळ आपले पद वाचविण्यासाठी फलटणमधील काहींनी खंडाळा आणि फलटण तालुक्यातील जनतेची मोठी प्रतारणा केली असल्याचे पाणी परिषदेच्या आयोजकांनी सांगितले. त्यामुळे खंडाळा येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी पुढे सांगितले. दोन दिवसांपूर्वी आयोजीत केलेल्या पाणी परिषदेला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर येणार होते. मात्र, खासदारांविरोधात कट रचला असल्याने ते येऊ शकले नसल्याचा गौप्यस्फोट आगवणे यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे. पाणी परिषदेला उपस्थित असलेल्या नाईक-निंबाळकर उपस्थित राहिले नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
"फलटण तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्याने पुणे जिल्ह्यातील काही गुंडांना सुपारी देवून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गाडीवर दगडफेक तसेच ही परिषद उधळून लावण्याची सुपारी दिली होती." अशी माहिती दिगंबर आगवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.