कराड (सातारा) -सर्पदंशापाठोपाठ काविळ आणि कोरोना रुग्णांवर प्रतिबंधक औषध म्हणून वापरण्यात आलेल्या पिनाक (Pinak medicine) या औषधाची आता एचआयव्हीग्रस्तांवरही चाचणी सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयासह कराड येथील दोन केंद्रांवर एचआयव्हीग्रस्त रूग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. या चाचणीला केंद्र सरकारच्या क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाकडून (सीटीआरआय) परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पिनाक औषधाचे (Pinak medicine) संशोधक आणि ससून रूग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एस. पवार यांनी दिली.
पिनाक औपधाची एचआयव्हीग्रस्तांवर चाचणी कोरोना संसर्गावरही पिनाक प्रभावीकोरोना संसर्गाच्या काळात कोरोना बाधितांवर पुण्याच्या श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये पिनाक गोळीची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी पिनाक औषधामुळे कोरोनाग्रस्तांचा संसर्ग कमी कालावधीत बरा होत असल्याचा निष्कर्ष प्राप्त झाला होता. आता एचआयव्हीग्रस्त, हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी (कावीळ) हा आजार बरा करण्यासाठी त्या संदर्भातील रुग्णांवर पिनाक औषधाच्या चाचण्या करण्यात येत आहेत.
सीटीआरआयची चाचणीला मान्यतापिनाक (Pinak medicine) या औषधाची उपयुक्तता समोर आल्यानंतर केंद्र सरकारच्या क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाने (सीटीआरआय) तसेच पुण्याच्या रॉयल पुणे इंडिपेंडंट एथिकल कमिटीने एचआयव्ही आणि काविळ रूग्णांवरील चाचणीला परवानगी दिली आहे. त्यानुसार पुण्यासह कराड येथील दोन रुग्णालयांमध्ये ही चाचणी केली जाणार आहे. काविळीसह एचआयव्हीग्रस्तांच्या स्वतंत्र रुग्णांवर ही चाचणी केली जाणार असल्याचे डॉ. पी. एस. पवार यांनी सांगितले.
सर्प, विंचू, मधमाशी दंशासाठी संशोधनपिनाक औषध (Pinak medicine) हे वनस्पतीजन्य आहे. संपूर्ण सुरक्षित असलेले औषध तोंडावाटे घ्यावयाचे औषध आहे. सर्पदंश, विंचूदंश व मधमाशीदंशासाठी सुरुवातीला या औषधाचे संशोधन झाले होते. या दंशांवर पिनाकचे औषध फारच प्रभावी ठरले. त्यानंतर कोरोना रूग्णांवर देखील त्याची मात्रा लागू पडली. आता एचआयव्ही आणि काविळ रूग्णांवर या औषधाची चाचणी केली जाणार आहे.
पुणे, कराडमध्ये होणार चाचणी पिनाक या (Pinak medicine) औषधाची कराडमधील भाग्यश्री क्लिनिक तसेच पुण्यातील डॉ. राजेश आणि डॉ. आरती व्यास यांच्या क्लिनिकमध्ये एचआयव्हीग्रस्त, काविळीच्या रुग्णांवर चाचणी होणार आहे. पिनाक या औषधाची कराडमधील श्री भराडी आयुर्वेदिक फार्मास्युटिकल्समध्ये निर्मिती केली जात आहे. या कंपनीकडून 2006 पासून पिनाक औषधाची मिर्मिती केली जात आहे. तसेच त्याचे पेटंटही घेतले आहे.
हेही वाचा -Farm laws to be repealed : तरीही शेतकरी आंदोलन सुरूच राहणार...वाचा काय म्हणतात राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikait)